Ashirvad Sooryavanshi Century
Who is Ashirwad Sooryavanshi younger brother of Vaibhav? १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता त्याचा धाकटा भाऊ आशीर्वादही चर्चेत आला आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे झालेल्या स्थानिक १५ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात आशीर्वादने धावांचा पाऊस पाडत शानदार खेळी केली. त्याने अवघ्या ११९ चेंडूंत १६८ धावा ठोकल्या.