Vaibhav Sooryavanshi selfie video viral IPL 2026
esakal
Why Vaibhav Sooryavanshi asked Rs 100 for selfie? १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आणखी एक वादळी शतक झळकावून जगाला आपली दखल घेण्यास पुन्हा भाग पाडले. IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव ३५७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर असलेला अभिषेक शर्मा ( ३८०) त्याच्यापासून फार दूर नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५७ चेंडूंमध्ये केलेल्या शतकामुळे राजस्थान रॉयल्सला २२८/६ अशी मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. मात्र, RRला हा सामना पाच विकेट्सने गमवावा लागला होता. SRH ने नऊ चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग यशस्वी केला.