Vaibhav Sooryavanshi: ३ चेंडूंत २ विकेट्स! वैभवने गोलंदाजीत प्रतिस्पर्धींना गार केले, संघाची डावाने विजयाच्या दिशेने वाटचाल, Video

Vaibhav Sooryavanshi picks two wickets in three balls: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू खेळाची झलक दाखवून दिली आहे. फलंदाज म्हणून आपल्या आक्रमक शैलीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभवने आता गोलंदाजीतही कमाल केली.
Duleep Trophy 2026

Vaibhav Sooryavanshi takes two wickets in an over

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi bowling performance in Duleep Trophy 2026 : इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणारा पूर्व विभागाचा संघ दुलीप ट्रॉफीत उत्तर-पूर्व विभागाविरुद्ध डावाने विजयाच्या दिशेने कूच करताना दिसतोय. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला फलंदाजीत जरी कमाल दाखवता आली नसली तरी त्याने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. फॉलोऑन स्वीकारून पुन्हा मैदानावर उतरलेल्या उत्तर-पूर्व विभागाच्या संघाचे दोन फलंदाज वैभवने एका षटकात माघारी पाठवले. त्यामुळे प्रतिस्पर्धींची अवस्था दुसऱ्या डावातही ८ बाद ९० अशी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com