Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Yashasvi Jaiswal Told to Leave Rajasthan Royals: वैभव सूर्यवंशीच्या झपाट्याने वाढलेल्या लोकप्रियतेमुळे राजस्थान रॉयल्समध्ये यशस्वी जैस्वाल झाकोळला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जैस्वालला राजस्थान रॉयल्स सोडण्याचा सल्ला दिला असून मुंबई इंडियन्स हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.
Yashasvi Jaiswal has reportedly been advised to leave Rajasthan Royals

Yashasvi Jaiswal has reportedly been advised to leave Rajasthan Royals

esakal

Updated on

Mumbai Indians best option for Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने आता राजस्थान रॉयल्सची साथ सोडून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याच्या पर्यायाचा विचार करायला हवा, असा सल्ला आता दिला जात आहे. वैभव सूर्यवंशीचा आक्रमक खेळ अन् त्याची वाढती लोकप्रियता, हे यामागचं कारण आहे. यशस्वी, भारताचा कसोटी क्रिकेटपटू. तेच दुसरीकडे वैभव ट्वेंटी-२० क्रिकेटमधील बेबी बॉस झालाय... यशस्वीकडे ५५ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे, तेच वैभव पदार्पणाच्या शोधात आहे. यशस्वीने आयपीएलचे सात पर्व खेळले आहेत, तर वैभव दुसराच हंगाम खेळतोय. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये वैभवच्या कामगिरीमुळे यशस्वीचे यश कुठेतरी झाकोळले जाताना दिसतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com