Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Vaibhav Suryavanshi eligibility for international cricket: भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी आता मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे. २७ मार्च २०२६ पासून तो ICC च्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे.
Vaibhav Suryavanshi eligibility for international cricket at age 15

Vaibhav Suryavanshi eligibility for international cricket at age 15

esakal

Updated on

Can Vaibhav Suryavanshi debut for Team India after IPL 2026? भारतीय संघाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी उद्यापासून सीनियर संघात खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. वैभवने युवा क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे आणि त्याला लवकरच रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासोबत खेळताना पाहण्याची संधी मिळू शकते. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरूवात होण्यापूर्वी वैभवच्या फॅन्सना ही आनंदाची बातमी मिळणार आहे. १४ वर्षीय वैभवने अल्पावधीत युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे आणि तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडूनही चमकला आहे. त्याला सीनियर संघात संधी मिळायला हवी, अशी इच्छा अनेक दिग्गजांनीही व्यक्त केली, परंतु आता ती पूर्ण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com