Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

Vaibhav Suryavanshi World Record : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बिहारचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. सूर्यवंशीने केवळ ६१ चेंडूत जबरदस्त १०८ धावांची नाबाद खेळी साकारत प्रतिस्पर्धी संघाचा डाव मोडून काढला.
Vaibhav Suryavanshi hammered a stunning 108 off 61 balls with 7 sixes and 7 fours

Vaibhav Suryavanshi hammered a stunning 108 off 61 balls with 7 sixes and 7 fours

esakal

Updated on

Bihar vs Maharashtra full match analysis Syed Mushtaq Ali Trophy : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रमाला गवसणी घातली. बिहार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत महाराष्ट्र संघाविरुद्ध विक्रमी शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर बिहारने २० षटकांत ३ बाद १७६ धावा उभ्या केल्या. वैभवने या शतकासह १४ व्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com