Vaibhav Suryavanshi created history by breaking Vijay Zol’s 12-year-old record
esakal
Vaibhav Suryavanshi surpasses Vijay Zol: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना आपल्या खेळीने मंत्रमुग्ध केले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राविरुद्ध विक्रमी शतक झळकावले. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्रा संघाने बाजी मारली. पण, ही मॅच वैभव सूर्यवंशींच्या विक्रमी शतकाने अजरामर केली.