Vaibhav Suryavanshi fails
Vaibhav Suryavanshi failed to deliver as Bihar lost: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शनिवारी वैभव सूर्यवंशी प्रतिनिधित्व करत असलेल्या बिहार संघाला पराभत पत्करावा लागला. दुसरीकडे चांगली कामगिरी करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) गोवा संघाने जम्मू काश्मीर विरुद्धच्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. वैभवचे अपयश बिहारला महागात पडले आणि त्यांना हैदराबादकडून हार पत्करावी लागली. तेच अर्जुनला बाहेर करणाऱ्या गोवा संघाने सहज विजय मिळवला.