
भारताचा १४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसाठी गेले काही महिने शानदार राहिले आहेत. तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सध्या वैभव भारताच्या १९ वर्षांखालील संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याने हा दौरा चांगलाच गाजवला आहे. त्याने वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली असून आता १९ वर्षांखालील कसोटी मालिकेची तयारी तो करत आहे.