Vaibhav Suryavanshi
Sakal
Cricket
U19 World Cup : ४ चौकार अन् ४ षटकारांसह वैभव सूर्यवंशीने विक्रमी फिफ्टी झळकावली, पण मोठा शॉट मारण्याच्या नादात झाला आऊट
Vaibhav Suryavanshi 24 Balls Fifty: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताच्या वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्ध विक्रमी अर्धशतक झळकावले. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
Vaibhav Suryavanshi Fifty in U19 India vs U19 Zimbabwe Match: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीतील भारताचा पहिला सामना झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो येथे मंगळवारी (२७ जानेवारी) सुरू आहे.
या सामन्यातही भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi) आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्याने या सामन्यात विक्रमी अर्धशतकही (Half Century) केले.

