Vaibhav Suryavanshi’s Explosive Knock
esakal
SMAT 2025 Vaibhav Suryavanshi vs Arjun Tendulkar battle : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत वैभव सुर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर ही दोन चर्चेत असणारी नावं समोरासमोर आली. कोलकाता येथे सुरू असलेल्या गोवा विरुद्ध बिहार या लढतीत वैभव-अर्जुन यामध्ये कोण बाजी मारेल, याची उत्सुकता होती. त्यामुळेच हा सामना कुठे पाहता येईल यासाठी क्रिकेट चाहत्यांची धडपड सुरू आहे. बिहारच्या वैभवने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली आणि गोव्याच्या गोलंदाजांना हैराण केले. पण, दीपराज गावंकरने गोव्याला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली.