Vaibhav Suryavanshi celebrates after surpassing Babar Azam to set a new Youth ODI record.
esakal
Vaibhav Suryavanshi surpasses Babar Azam Youth ODI record : भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने युवा वन डे क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. १६ किंवा त्याहून कमी वयात युवा वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वैभव जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात वैभवला १६ धावा करता आल्या असल्या तरी त्याच्या नावावर मोठा पराक्रम नोंदवला गेला.