गेल्या आठवड्यात वर्ल्ड कप जिंकला, आता दहावीची परीक्षा देणार वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi ssc exam : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता क्रिकेटच्या मैदानानंतर बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार झाला आहे. त्याची दहावीची परीक्षा सुरू होणार असून १७ फेब्रुवारीला पहिला पेपर होणार आहे.
From World Cup glory to SSC exam for Vaibhav Suryavanshi

From World Cup glory to SSC exam for Vaibhav Suryavanshi

Esakal

Updated on

अंडर २९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तुफान फटकेबाजी केलेला भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता मैदानानंतर शाळेच्या परीक्षेला सामोरं जाणार आहे. वैभव सूर्यवंशीची १७ फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाला अंडर १९ क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका वैभव सूर्यवंशीने गेल्याच आठवड्यात पार पाडली. यानंतर आता तो दहावीच्या परीक्षेचा पेपर देणार आहे. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर अभ्यासाच्या मैदानात त्याची परीक्षा असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com