VAIBHAV SURYAVANSHI
VAIBHAV SURYAVANSHIesakal

INDU19 vs ENGU19: १०,००० रूपयांचा चेंडू! वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यासाठी केला खास सराव, उलगडलं दणादण षटकारांमागचं रहस्य

Vaibhav Suryavanshi’s England tour preparation : आयपीएल २०२५ गाजवणारा वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करतोय. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या दोन वन डे सामन्यात त्याने ४८ व ४५ धावांची वादळी खेळी केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याने विशेष सराव केला होता आणि त्यासाठी त्याने १० हजार रुपयांच्या चेंडूवर सराव केला होता.
Published on

The ₹10,000 Secret Behind Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Spree भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताला हार मानावी लागली आणि त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. पण, या दोन्ही सामन्यांत वैभव सू्र्यवंशीने आपल्या आक्रमक फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले. वैभवने या दोन सामन्यांत झटपट ४८ व ४५ धावांची खेळी केली. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याने बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत १९० धावांचे वादळ आणले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com