Vaibhav Suryavanshi 45 goes in vain as England levels series भारताच्या १९ वर्षांखालील संघाला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वैभव सूर्यवंशी व विहान मल्होत्रा यांच्यासह राहुल कुमार व कनिष्क चौहान यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने मोठे आव्हान उभे केले. पण, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाकडून कर्णधार थॉमस रेव ( Thomas Rew) याने खणखणीत शतक झळकावले आणि ३ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.