Ayush Loharuka celebrates his double century
esakal
Ayush Loharuka scores 226 runs for Bihar in Ranji Trophy 2025-26 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला उप कर्णधार म्हणून पहिल्याच रणजी सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. बिहारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभवला अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावात फक्त १४ धावा करता आल्या. त्याने ५ चेंडूंत २८० च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या. याच सामन्यात वैभवचा सहकारी आयुष लोहरुकाने द्विशतकी खेळी केली. त्याला अनविर किशोर, एस गानी, बिपिन सौरभ यांच्या अर्धशतकांची साथ मिळाली.