INDU19 vs AUSU19: वैभव सूर्यवंशीचे तीन मोठे विक्रम अन् भारताच्या 'यंगिस्तान'ने ऑस्ट्रेलियाला कसोटीत डावाने हरवले

India U19 Crush Australia U19 by an Innings:भारताच्या यंगिस्तानने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली धमक दाखवत ऑस्ट्रेलिया U19 संघाचा कसोटीत डावाने पराभव केला. भारताने हा सामना इनिंग आणि तब्बल 58 धावांनी जिंकत मालिकेत वर्चस्व गाजवलं.
Vaibhav Suryavanshi celebrates as India U19 crush Australia by an innings and 58 runs.

Vaibhav Suryavanshi celebrates as India U19 crush Australia by an innings and 58 runs.

esakal

Updated on

India U19 vs Australia U19 Marathi cricket updates : भारताच्या १९ वर्षांखालील युवा संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातच पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील २४३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४२८ धावा चोपल्या. त्यानंतर पुन्हा फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव १२७ धावांवर गुंडाळला गेला. भारताने हा सामना एक डाव व ५८ धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वेदांत त्रिवेदी व वैभव सूर्यवंशी यांनी शतक झळकावून मॅच भारताच्या बाजूने झुकवली. त्यानंतर दीपेश डी, किशन कुमार व खिलान पटेल यांची साथ मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com