
U19 India vs Malaysia Women: मलेशियामध्ये १९ वर्षांखालील महिला टी२० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळवली जात असून भारताच्या संघाने मंगळवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. १९ वर्षांखालील भारतीय संघाने दुसरा सामनाही सहज जिंकत पुढच्या फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
मंगळवारी भारतीय महिला संघाने यजमान मलेशियाच्या १९ वर्षांखालील महिला संघाला १० विकेट्सने पराभूत केले. भारताने पहिल्या सामन्यातही वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या २६ चेंडूत विजयी लक्ष्य गाठले होते. आता मलेशियाविरुद्धही भारताने १७ चेंडूतच विजयी लक्ष्य पूर्ण केले.