Varun Chakaravarthy has become the No.1 ranked T20I bowler in the ICC Men’s Player Rankings
esakal
भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती ICC T20I क्रमवारीत नंबर वन गोलंदाज ठरला.
तो या यादीत अव्वल स्थान मिळवणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला; याआधी बुमराह व बिश्नोई अव्वल होते.
वरुणने न्यूझीलंडचा जेकब डफी, विंडीजचा अकील होसेन व ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा यांना मागे टाकले.
Indian bowler crowned ICC No.1 in ICC Men's T20I Player Ranking: भारतीय संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत नंबर वन गोलंदाज ठरला. ट्वेंटी-२० गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी जसप्रीत बुमराह व रवी बिश्नोई यांनी हा मान पटकावला आहे. ३४ वर्षीय गोलंदाजाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना न्यूझीलंडच्या जेकब डफीकडून अव्वल स्थान हिसकावला. त्याने यासह वेस्ट इंडिजच्या अकील होसेन व ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पालाही मागे टाकले.