

Varun Chakravarthy Ruled Out of Ireland T20I Series
Sakal
India Tour of Ireland 2026: भारताच्या टी२० संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अद्याप एकही टी२० मालिका खेळलेली नाही. या विश्वविजयानंतर पहिल्यांदा भारताचा टी२० संघ आता मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे टी२० संघात काही मोठे बदल झाले आहेत.
भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाची धूरा आता श्रेयस अय्यर सांभाळणार आहे, तर तिलक वर्मा उपकर्णधार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा टी२० संघ (India T20I Squad) पहिला परदेशी दौरा आयर्लंडचा करणार आहे. पण असे असतानाच भारतीय टी२० संघाला धक्का बसला आहे.