Varun Chakravarthy strengthened his No.1 position in ICC T20I bowler rankings
esakal
Varun Chakravarthy No 1 bowler ICC T20I rankings: भारताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्थी याने आयसीसी ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमावरीतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. त्याने कारकीर्दितील सर्वाधिक रेटींग गुणांची कमाई करताना पाकिस्तानी गोलंदाज शादाब खान याला मागे सोडले आहे आणि आता त्याला शाहिद आफ्रिदीचा विक्रम खुणावतोय. वरूण चक्रवर्थीने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याच्या रेटींग गुणांत भर पडली आणि तो ८१८ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.