
Maharashtra Defeated By Vidarbha in Semifinal : विदर्भ संघाच्या तुफान फलंदाजीसमोर महाराष्ट्राला झुकतं माप घ्यावे लागले. विदर्भाच्या आघाडी फलंदाजांनी उभा केलेला धावांचा डोंगर महाराष्ट्राला पार करता आला नाही आणि त्यामुळे निर्णायक सामन्यात महाराष्ट्राला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. ध्रुव शोरे, यश राठोड यांच्या शतकी व करुण नायर, जितेश शर्माने यांच्या अर्ध शतकी खेळीने महाराष्ट्राला आधीच बॅकफूटवर टाकले होते. त्यात गोलंदाजांनी जलग विकेट्स मिळवत दबाव निर्माण केला व सामना आपल्या पारड्यात फिरवत फायनल गाठली.