
मंगळवारी (४ मार्च)चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जात आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा मैदानातही रोमांच दिसतो. दोन्ही संघही एकमेकांविरुद्ध चुरशीने खेळत असतात. अशाच मैदानात घडणाऱ्या काही घटनांचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचाही एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.