भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या प्रकृतीच्या समस्यांमुळे चर्चेत आहे. त्याच्या लहान भावाने दिलेल्या माहितीनुसार, विनोद अजून पूर्ण बरा झाला नसला तरी तो आजारांविरुद्ध लढत आहे. त्याला चालताना आणि बोलताना त्रास होतो..भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात त्याची प्रकृती खालावल्याचे दिसून आले होते. त्याला काही महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्येही ऍडमिट केले होते. दरम्यान तो आता कसा आहे, त्याला काय झाले आहे याबाबत आता त्याच्यात लहान भावाने विरेंद्र कांबळीने माहिती दिली आहे..Vinod Kambli ने पैशांची पर्वा कधीच केली नाही, वडिलांकडून ७०० पाऊंड घेऊन मित्रांवर उडवले; जुन्या मित्राकडूनच खुलासा.गेल्या वर्षी विनोद कांबळीचे काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यात त्याला चालतानाही त्रास होत असल्याचे दिसले होते. तसेच त्याची तब्येतही खराब झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्याच्यावर बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारही करण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्या त्याच्यासोबत होते. दरम्यान विरेंद्र कांबळीने दिलेल्या माहितीनुसार अद्याप विनोद पूर्ण बरा झाला नसला तरी तो त्याच्या आजारांविरुद्ध लढत आहे..विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्रने सांगितले, 'विनोद सध्या घरी आहे. तो स्थिर होत आहे. पण अजून उपचार सुरू आहेत. त्याला बोलताना त्रास होतो. त्याला बरं होण्यासाठी काही वेळ लागेल. पण तो चॅम्पियन आहे आणि तो परत येईल. आशा आहे तो चालायला आणि पळायलाही लागेल. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. मला आशा आहे की तुम्ही त्याला परत मैदानात पाहाल.'.विरेंद्र कांबळीने विनोदवर सुरू असलेल्या उपचारांबद्दलही माहिती दिली. तो म्हणाला, 'त्याने १० दिवसांसाठी पुनर्वसन केले. त्याच्या संपूर्ण बॉडी चेक-अप केले आहे. त्याच्या मेंदूचेही स्कॅन झाले, तर युरिन टेस्टही झाली. खूप समस्या नाहीयेत, पण तो चालू शकत नाही. त्यामुळे त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याला बोलतानाही त्रास होतो. पण तो बरा होत आहे. मी फक्त लोकांना इतकंच सांगेल की त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याला तुमच्या प्रेमाची आणि साथीची गरज आहे.'.Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'.यादरम्यान, विरेंद्र कांबळीने असेही सांगितले की सचिन तेंडुलकरही नेहमी विनोदची विचारपूस करत असतो. विनोद कांबळीने भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४ शतकांसह १०८४ धावा केल्या, तर वनडेत २ शतकांसह २४७७ धावा केल्या आहेत..FAQsप्रश्न १: विनोद कांबळीची तब्येत कशी आहे?(Question: How is Vinod Kambli’s health?)➤ विनोद कांबळी सध्या घरी आहे, उपचार सुरू असून अजून पूर्ण बरा झालेला नाही.प्रश्न २: विनोद कांबळीला काय त्रास आहे?(Question: What illness is Vinod Kambli suffering from?)➤ विनोद कांबळीला चालणे व बोलणे यात अडचणी आहेत, त्यामुळे फिजिओथेरपी सुरू आहे.प्रश्न ३: विरेंद्र कांबळीने काय माहिती दिली?(Question: What did Virendra Kambli reveal?)➤ विनोद अजूनही आजाराविरुद्ध लढत असून, त्याला बरे होण्यासाठी वेळ लागेल असे त्याने सांगितले.प्रश्न ४: विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द कशी आहे?(Question: How is Vinod Kambli’s cricket career?)➤ विनोद कांबळीने भारतासाठी १७ कसोटी व १०४ वनडे सामने खेळले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.