Vinod Kambli latest video from Thane care centre
esakal
Vinod Kambli health update latest news: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या एका ताज्या व्हिडिओने चाहत्यांना धक्का बसला आहे. तो वृद्धाश्रमात राहत असल्याचा दावा या व्हिडिओतून केला जात आहे. त्यामुळे चाहते त्याच्या प्रकृतीबद्दलही चिंतित झाले आहेत. मात्र, विनोद हा वृद्धाश्रमातील सुविधांची प्रशंसा करताना दिसतोय आणि तो भावूक झालेलाही दिसत आहे. मागच्यावेळेस विनोद भिवंडीच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. आताही तो तंदुरुस्त दिसतोय, परंतु चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून चिंता वाटतेय.