
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी त्याच्या प्रकृतीमुळे गेल्या ६ महिन्यात चर्चेचा विषय ठरला होता. ९० च्या दशकात कांबळी हा भारताचा प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. तो भारताचा भविष्यातील स्टार खेळाडू समजला जात होता.
पण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरूवात केलेल्या कांबळीची काही वर्षातच कामगिरीत घसरणही झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला त्याची कारकिर्द त्याच्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि बेशिस्तपणामुळे दीर्घकाळ चालवता आली नाही.