
Vinod Kambli Update: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. त्याची बिघडलेली प्रकृती एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या कांबळी त्याच्या आजारपणावर उपचार घेत आहे. याचदरम्यान त्याच्याबाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
विनोद कांबळीचा प्रवास आता क्रिकेट चाहत्यांना मोठ्या पडद्यावरही पाहाता येऊ शकते. त्याचा शनिवारी (१८ जानेवारी) वाढदिवस असून याच निमित्ताने त्याच्यावर अधारित बायोपिक बनत असल्याची माहिती समोर आली आहे. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांनी माहिती दिली आहे की सध्या विनोद कांबळीच्या बायोपिकवर सध्या काम सुरू आहे.