
Golden Jubilee Celebration at Wankhede Stadium: मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात रविवारपासून (१२ जानेवारी) झाली असून सांगता १९ जानेवारी रोजी होणार आहे.
वानखेडे स्टेडियमच्या या सुवर्ण महोत्सवी भव्य सोहळ्यात अनेक आजी-माजी क्रिकेटपटूही सहभागी होणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते. मुंबईतून अनेक खेळाडू भारतासाठी खेळले आहेत. त्यातही भारताच्या क्रिकेट इतिहासात वानखेडे स्टेडियमला एक विशेष स्थानही लाभले आहे.