
Vinod Kambli Video: मुंबई क्रिकेट संघटनेकडून वानखेडे स्टेडियमच्या ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जल्लोषात सेलीब्रेशन करण्यात आले. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी रविवारी भव्य दिव्य समारंभ पार पडला, ज्यात सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल असे अनेक आजी-माजी खेळाडू हजर होते.
यावेळी मुंबईचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीही उपस्थित होता. कांबळी गेल्या काही दिवसात त्याच्या खराब प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. यावेळीही त्याच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. अजूनही त्याला चालताना कोणाचा तरी आधार घ्यावा लागत आहे.