
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसात त्याच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. त्याला डिसेंबर २०२४ च्या अखेरीस दोन आठवडे हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. अद्यापही त्याला चालताना आधाराची गरज लागत असल्याचे दिसून आले आहे.
कांबळीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार गेल्या काही वर्षात आले आहेत. मात्र, त्याच्यासोबत त्याची पत्नी अँड्रिया आणि मुलं उभं राहिल्याचे दिसले आहे. तथापि, त्यांच्यातही सर्वकाही चांगलेच चालले आहे, असे नव्हतं. पण वाद झाल्यानंतरही अँड्रियाने कांबळीसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता ती व्यक्त झाली आहे.