Sachin Tendulkar stranded in jungle after storm forces emergency landing
esakal
सचिन तेंडुलकर आफ्रिकेतील मसाई मारा सफारीदरम्यान वादळात अडकलेल्या विमानात होता आणि त्याचा अनुभव त्याने चाहत्यांना सांगितला.
विमान फक्त दोन मैलांवर असूनही खराब हवामानामुळे नियोजित धावपट्टीवर लँडिंग करता आलं नाही.
पायलटने दुसऱ्या विमानतळावर वळवलं, पण तिथल्या धावपट्टीवर विल्डबिस्ट प्राणी मोठ्या प्रमाणावर होते.
Sachin Tendulkar stranded in wild jungle after storm: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा आफ्रिकन दौऱ्यावर आहे आणि त्याने तिथे आलेला भयानक अनुभव चाहत्यांना सांगितला आहे. त्याने मसाई मारा दौऱ्यादरम्यानचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि तिथे विमानातून प्रवास करताना गंभीर प्रसंगाशी कसा सामना करावा लागला, हे त्याने सांगितले आहे. सचिनने व्हिडिओसोबत एक खास कॅप्शनही लिहिलं आहे, जंगल आपलं स्वागत करण्याचं त्यांना हव्या त्या पद्धतीने करतो. आमचा मार्ग थोडा भरकटला, पण, मजा आली.