
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये पहिलीच मालिका खेळताना पहिल्या दोन कसोटीतच त्याने पावणेसहाशे धावा चोपल्या आहेत. इतकेच नाही, तर ऍजबॅस्टनवर भारताने पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याचाही पराक्रम त्याच्या नेतृत्वात केला.
आता तिसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानात १० जुलैपासून सुरू झाला आहे. दरम्यान, तिसऱ्या सामन्यापूर्वी दोन दिवस आधी शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर आमने-सामने आल्याने बरीच चर्चा झाली, आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.