Vaibhav Suryavanshi spotted at Wankhede Stadium during the India vs England T20 World Cup semifinal.
esakal
Vaibhav Suryavanshi appearance at Wankhede stadium video viral: भारत-इंग्लंड यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. रणबीर कपूर, आलिया भट, अनिल कपूर, वरुण धवन या बॉलिवूड सेलिब्रेटींसह महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, लोकेश राहुल आदी क्रिकेटचे स्टारही उपस्थित होते. उद्योगपती अंबानी कुटुंबीयही उपस्थित होते आणि त्यांनी या सामन्याचा आनंद लुटला. पण, या सर्वात भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीही वानखेडेवर उपस्थित होता, परंतु त्याच्याकडे कुणाचे लक्षच नाही गेले.