RCB CEO on Virat Kohli future
esakal
RCB CEO comments on Virat Kohli IPL future: जर महेंद्रसिंग धोनी वयाच्या ४४ व्या वर्षीही इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सक्रिय राहू शकतो, तर मग विराट कोहली का नाही? विराट ३७ वर्षांचा झाला असला तरी तो सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याची जिद्द, प्रेरणा आणि तंदुरुस्ती या सर्वांनी मिळून त्याला खेळाच्या शिखरावर पोहोचवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघासोबत सलग दोन आयपीएल विजेतेपदे जिंकल्यानंतर, विराटमध्ये तीच जिद्द कायम आहे का, असा प्रश्न पडू शकतो. विराटकडे आता सिद्ध करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. त्याला जे हवं ते त्याने मिळवलं आहे आणि म्हणूनच तो २०३० पर्यंत आयपीएल खेळणार का? असा प्रश्न समोर आला आहे.