

Virat Kohli - Bhuvneshwar Kumar Viral Video
Sakal
रविवारी (३१ मे) अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल २०२६ स्पर्धेचे (IPL 2026) विजेतेपद जिंकले. बंगळुरुने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.
बंगळुरूसाठी गेले दोन हंगाम अत्यंत अविस्मरणीय ठरले आहेत. पहिल्या १७ आयपीएल हंगामात बंगळुरूला एकदाही विजेतेपद जिंकता आले नव्हते, पण त्यानंतर त्यांनी १८ आणि १९ व्या हंगामांचे विजेतेपद जिंकून आयपीएल इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचं नाव कोरलं.