
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये जोरदार तयारी करत आहेत. भारतीय संघाला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. विशेष म्हणजे या मालिकेपासून शुभमन गिलच्या नेतृत्वालाही सुरुवात होणार आहे.
या मालिकेपूर्वी भारताचे अनुभवी खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. त्यामुळे कर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली. त्याच्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे.