
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. दुबईला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तीनदा ही स्पर्धा जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे.