

Virat Kohli Century | IPL 2026
Sakal
IPL 2026, RCB vs KKR, Marathi News : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru ) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पराभवाचा मोठा धक्का दिला.
रायपूरला झालेल्या सामन्यात बंगळुरूने कोलकाताला ६ विकेट्सने पराभूत करत ८ व्या विजयासह प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे. बंगळुरूच्या या विजयात विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा वाटा राहिला. त्याला या सामन्यातील शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही (POTM) सन्मानित करण्यात आले.