

Virat Kohli Century | IPL 2026
Sakal
IPL 2026, RCB vs KKR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru) बुधवारी कोलकता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) घोडदौड रोखली. बंगळुरूने रायपूरला झालेला हा सामना ६ विकेटने जिंकला आणि प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले.
गेल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने या सामन्यात शतकी खेळी करत त्याला चेसमास्टर का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्याने या सामन्यात शतक करताना मोठे विक्रमही मोडले आहेत.