

Virat Kohli
Sakal
Virat Kohli picks all time RCB playing 11: इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाला (IPL 2026) २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे.
पहिल्या हंगामापासून भाग राहिलेल्या RCB ची विजेतेपदाची प्रतिक्षा तब्बल १८ व्या हंगामात पूर्ण झाली. हा संपूर्ण प्रवास एका सदस्याने पाहिला, तो सदस्य म्हणजे विराट कोहली (Virat Kohli).
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट RCB साठी खेळत आहे. त्यामुळे त्याने या संघाचा आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. विशेष म्हणजे तो सलग १९ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडूही आहे. त्यामुळे नुकतेच त्याने RCB ची सर्वोत्तम त्याची आवडती प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.