Virat Kohli : विराट कोहली T20 World Cup मध्ये खेळणार? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

T20 World Cup 2024 Virat Kohli News : आयपीएल 2024 नंतर क्रिकेटप्रेमींना टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार पाहायला मिळणार आहे.
T20 World Cup Virat Kohli News Marathi
T20 World Cup Virat Kohli News Marathi sakal

T20 World Cup 2024 Virat Kohli News : आयपीएल 2024 नंतर क्रिकेटप्रेमींना टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार पाहायला मिळणार आहे. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्याचबरोबर आगामी वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहली या स्पर्धेत खेळणार की नाही, बीसीसीआयचे निवडकर्ते त्याचा टीम इंडियाच्या संघात समावेश करणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

T20 World Cup Virat Kohli News Marathi
दारूच्या नशेत महिला खेळाडूंवर विनयभंग अन् मारहाण! भारतीय फुटबॉल महासंघाचा 'तो' पदाधिकारी निलंबित

सोशल मीडियावर चाहतेही यासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत, त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही उत्तर दिले की निवड ही सोशल मीडिया मीम्सच्या आधारे होत नाही. पण आता आयसीसीने विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे, त्यानंतर विराट कोहली 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नक्कीच खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

T20 World Cup Virat Kohli News Marathi
Virat Kohli : चिन्नास्वामीवर कोहलीने पुन्हा रचला इतिहास! टी-20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, आयसीसीने आता टी-20 वर्ल्ड कप 2024 चे नवीन पोस्टर जारी केले आहे.

खरंतर या पोस्टरवर विराट कोहलीचा फोटोही दिसत आहे. त्यानंतर चाहत्यांना आशा वाटू लागली आहे की विराट कोहली 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नक्कीच खेळताना दिसेल. या पोस्टवर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, आयसीसी स्वतः कोहलीच्या वर्ल्ड कपमधील सहभागाची पुष्टी करत आहे.

आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आतापर्यंत विराट कोहली या स्पर्धेत अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 2 अर्धशतकांसह 181 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com