Cricket Fraternity Ahmedabad Plane CrashSakal
Cricket
आम्ही प्रार्थना करतो! Ahmedabad plane crash नंतर विराट-रोहितसह क्रिकेटविश्व भावुक
Cricket Fraternity Ahmedabad Plane Crash: गुरुवारी अहमदाबादमध्ये लंडनला जात असलेल्या प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला. यात २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेवर विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त होत आहे.
गुरुवारी (१२ जून) गुजराततमधील अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबाद हवाई अड्ड्याजवळ मेघाणी नगर परिसरात एअर इंडिया फ्लाइट AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) हे प्रवासी विमान क्रॅश झालं.
हे विमान लंडनला जात होतं. यात २४२ प्रवासी आणि पायलट आणि इतर चालक दलाचे सदस्य होते. यातील कोणीही वाचले नसल्याची भीती सध्या व्यक्त होत आहे, इतका मोठा हा अपघात होता.ल

