Team India: विराट, रोहित अन् बुमराहला विश्रांती, तर श्रीलंका दौऱ्यातून 'या' तीन खेळाडूंचे होणार भारतीय संघात कमबॅक?

India Tour of Sri Lanka: जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून त्यात विराट, रोहित आणि बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India Tour of Sri Lanka: झिम्बाब्वेच्या टी-20 सीरीजनंतर लगेच भारतीय संघाला श्रीलंकेचा दौरा आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताला तीन वनडे आणि तीन टी-20 सीरीज खेळायचे आहेत.

दरम्यान, या दौऱ्यासाठीही भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, विराट कोहली, आणि जसप्रीत बुमसाह यांना विश्रांती देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यातील विराट आणि रोहित यांनी तर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे.

विराट, बुमराह आणि रोहित या तिघांनीही जर वनडे मालिकेसाठीही विश्रांती दिली, तर त्यांच्या जागेवर कोणत्या खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते, हे जाणून घेऊ.

Team India
Team India Victory Parade : कोहली, जडेजाचा मुंबई पोलिसांना सॅल्यूट! मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे

१. केएल राहुल

केएल राहुलला टी२० संघात स्थान मिळणे कठीण आहे, मात्र तो वनडेमध्ये खेळणे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत राहुलकडे कर्णधारपदाची जवाबदारी दिली जाऊ शकते.

त्याने शेवटचा वनडे सामना डिसेंबर 2023 खेळला, तर इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामन्यात तो अखेरचा दिसला होता. केएल राहुल प्रदिर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.

Team India
Rahul Dravid Video Viral: टी20 वर्ल्ड कप जिंकून आलेल्या 'गुरू'ला लहान मुलांकडून गार्ड ऑफ ऑनर; द्रविडनंही जिंकली मनं

२. श्रेयस अय्यर

वनडे वर्ल्ड कप श्रेयस अय्यर बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. त्याला टी२० वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते.

मात्र तो वनडे संघातील नियमित खेळाडू असल्याने श्रीलंका दौऱ्यातून त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर वनडे संघातील महत्त्वाचा फलंदाजही ठरू शकतो.

३. प्रसिध कृष्णा

वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. तो आयपीएल २०२४ स्पर्धाही खेळला नव्हता. मात्र आता बुमराहच्या अनुपस्थितीत त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.