When Will Virat, Rohit Play Next In The Vijay Hazare Trophy?
esakal
Where to watch Rohit & Virat Vijay Hazare match : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रेक असल्याने विराट कोहली व रोहित शर्मा यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घेतला. विराट १४ वर्षानंतर, तर रोहित ७ वर्षानंतर या स्पर्धेत आपापल्या संघाकडून खेळताना दिसले. रोहित मुंबईकडून व विराटने दिल्लीकडून पहिल्याच सामन्यात शतक झळकावताना आपला क्लास दाखवला. त्यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने सिक्कीमवर व दिल्लीने आंध्र प्रदेशवर विजय मिळवला. आता पहिल्याच सामन्यात शतक पाहायला मिळल्यानंतर दुसरा सामना केव्हा, याची उत्सुकता असणे साहजिक आहे.