

Virat Kohli Shubman Gill Video
Sakal
Virat Kohli - Shubman Gill Viral Video: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (IPL 2026) साखळी फेरी आता संपली असून प्लेऑफला सुरुवात होणार आहे. प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) या संघांनी पाँइंट्स टेबलमध्ये पहिले दोन क्रमांक मिळवले असल्याने या दोन संघात क्वालिफायर १ (Qualifier 1) सामना होणार आहे.
हा सामना धरमशाला येथे मंगळवारी (२६ मे) होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ विजेतेपदाच्या जवळ पोहचणार आहे. पण या सामन्यापूर्वी बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची थट्टा-मस्करी करताना दिसला होता.