
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून सोमवारी (१२ मे) निवृत्ती जाहीर करत अचानक सर्वांना धक्का दिला. विराटची कामगिरी आणि वय पाहातो तो अजून दोन वर्षे सहज खेळू शकतो असं अनेकांना वाटत होतं. पण ३६ वर्षीय विराटने कसोटीत थांबण्याचा निर्णय घेतला.
भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसात भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. पण त्याआधीच विराटने निवृत्ती घेतल्याने सर्वांना धक्का बसला. त्याच्या निवृत्तीमागे काय कारण असावे अशी चर्चाही होत आहे.