Phil Salt is set to return for Royal Challengers Bengaluru
esakal
Virat Kohli and Phil Salt opening partnership IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमधील तीन संघ निश्चित झाले आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा पहिला मान पटकावला. आता २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवून ते क्वालिफायर १ मधील जागा पक्के करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. अशात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बोटाच्या दुखापतीमुळे महिनाभर आयपीएलपासून दूर राहिलेला फिल सॉल्ट या आठवड्याच्या अखेरीस भारतात परतणार आहे.