

Aryavir Sehwag Century | U19 Asia Cup | India vs UAE
Sakal
१९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत अखेरचा साखळी सामना १९ वर्षीय आर्यवीर सेहवागने गाजवला आहे. मंगळवारी भारताचा अखेरचा साखळी सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध झाला. या सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात दीडशतकी खेळी केली.