

VVS Laxman Defends CoE Facility
Sakal
VVS Laxman Breaks Silence on BCCI CoE Injury Controversy: भारतीय क्रिकेटपटूंच्या वाढत्या दुखापती यामुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. तसेच बंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सलन्समधील कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवड समिती व सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्यामधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया हे सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE), राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (VVS Laxman) यांना रविवारी (९ जुलै) भेटले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मणने सेंटर ऑफ एक्सलन्सची पाठराखण केली आहे.