Washington Sundar after Asia Cup snub joins county cricket
esakal
आशिया चषकासाठी श्रेयस अय्यर व वॉशिंग्टन सुंदरची निवड न झाल्याने अनेकांनी टीका केली.
इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करूनही वॉशिंग्टनला आशिया चषक संघात स्थान मिळाले नाही.
निराश न होता त्याने कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला
आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड झाली, तेव्हापासूनच काही खेळाडूंना संधी न देण्यावरून टीका सुरू झाली होती. श्रेयस अय्यर व वॉशिंग्टन सुंदर ही नावं आशिया चषकासाठीच्या संघातून गायब दिसली. वॉशिंग्टनने इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती, तर श्रेयस अय्यर सातत्याने चांगला खेळत आला आहे. तरीही त्यांची निवड न होणे, अनेकांना आवडले नाही. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने तर आशिया चषक स्पर्धेत वॉशिंग्टनची उणीव जाणवेल, असे भाकित केले. पण, आशिया चषक स्पर्धेत संधी न मिळाल्याने निराश न होता वॉशिंग्टनने कसोटी मालिकेची तयारी सुरू केली आहे.